Wednesday, 13 March 2013

ते होतं का प्रेम ?

तुला कधीच कळलं  नाही आणि मला कधीच सांगता आलं नाही
ते होतं का प्रेम ?

माझ्या डोळ्यांत चमकत होतं  पण तुला कधीच दिसत नव्हतं 

ते होतं का प्रेम ?

माझ्या मनाला कळलं होतं  पण तुझ्या मनाला कधी उमगलच नाही

ते होतं का प्रेम ?

तू समोर असूनही कधी तुझ्यापर्यंत पोहचवताच आलं  नाही

ते होतं का प्रेम ?

माझं गप्प बसणं सुद्धा खूप काही बोलून जात होतं

ते होतं का प्रेम ?

माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं  होतं

ते होतं का प्रेम ?