हम अपनी पूरी ज़िन्दगी उनके नाम करदे,
उन्हें जाकर कोई कहें की सिर्फ एक बार ओ हा करदे...
एक अबोल प्रेम..............
Thursday, 5 February 2015
Tuesday, 20 January 2015
कल्पना
कल्पनेच्या जगात जगायला खुप बरे वाटते
पण वास्तवाला नेहमीच सामोरे जावे लागते
कल्पनेचे पुल बांधताना डोळ्यात अनोखी चमक येते
वास्तवाची जेव्हा जाणीव होते तेव्हा भाबड्या मनाचीच कीव येते.
Saturday, 31 August 2013
दिशा
आयुष्याला दिशा होतीच कुठे
दिशाहीन आयुष्य मुळात जगलोच कुठे
खरं तर जगणं कशाला म्हणतात हे कळलेच कुठे
प्रवाहासोबत मीही वाहत गेलो, मला तरी कुठे माहित
होते मला जायचंय
वाहणाऱ्या पाण्याला कधी माहित नसतं आपण कुठे
चाललोय ते फक्त वाहत असतं प्रवाहाबरोबर
निदान ते स्वछंदपणे वाहत तरी
पण मला तेही नाही जमले
मी फक्त वाहतच गेलो.

कधी कधी
कधी कधी एखाद्या आठवणीने मन गहिवरून येतं
अलगद डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं
चित्रातलं माणूस अजूनही आपल्या मनावरती राज्य
करतंय याची एक हलकीशी जाणीव मन करून देतं
कधीतरी त्या चेहऱ्यासाठी झुरणारं मन अजूनही
तेवढंच झुरतं याचा विचार मन मनाशीच करतं
ज्या माणसाने आपल्याला कधीच आपलंसं केलं नाही
त्याच्यासाठी हृदय अजूनही रडतं याचही आश्चर्य वाटतं

Saturday, 4 May 2013
एक वादळ
एक वादळ माझ्याही आयुष्यात आलं होतं
काही क्षणांसाठी मनाला भुरळ घालून गेलं होतं
का? कुणास ठाऊक मन त्यात गुरफटत गेलं होतं
एखाद्या पाचोळ्याप्रमाणे आकाशात उंचच उंच उडत गेलं होतं
वादळाला कधी दिशा नसते हेच खंर असतं
पण वेड्या मनाला कितीही समजावून सांगितलं तरी समजत नसतं
शेवटी वादळाने त्याची दिशा बदललीच
मन मात्र जितक्या वेगाने आकाशात उडाले होते
तितक्याच वेगाने जमिनीवर आपटले आणि विखुरले

Wednesday, 13 March 2013
ते होतं का प्रेम ?
तुला कधीच कळलं नाही आणि मला कधीच सांगता आलं नाही
ते होतं का प्रेम ?
माझ्या डोळ्यांत चमकत होतं पण तुला कधीच दिसत नव्हतं
ते होतं का प्रेम ?
माझ्या मनाला कळलं होतं पण तुझ्या मनाला कधी उमगलच नाही
ते होतं का प्रेम ?
तू समोर असूनही कधी तुझ्यापर्यंत पोहचवताच आलं नाही
ते होतं का प्रेम ?
माझं गप्प बसणं सुद्धा खूप काही बोलून जात होतं
ते होतं का प्रेम ?
माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं होतं

Saturday, 26 January 2013
Subscribe to:
Posts (Atom)