Saturday, 26 January 2013

शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं

सांगता सांगता राहूनच गेलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं

मनातलं प्रेम मनातच राहून गेलं 
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं

हृदयातलं दुःख डोळ्यांत येऊन  आटून गेलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं

डोळ्यांसमोरून तुला दूर होताना मनाने कसं सहन केलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं

Thursday, 3 January 2013

असं कधी कधी का होतं...

असं कधी कधी का होतं
एखादं माणूस मनाला खूप वेड लावून जातं            

डोळ्यांसमोर नसलं की मन सैरभैर होतं
डोळ्यांसमोर असलं की नक्षत्राचं चांदणं वाटतं         

बेरंग आयुष्यात इंद्रधनुचे रंग भरून जातं
एकाकी आयुष्याला एक साथ देऊन जातं

काहीही झालं तरी मन त्याच्याकडेच ओढ घेतं
होणार नसतं आपलं तरी मन तिथेच घुटमळत राहतं

असं कधी कधी का होतं
एखादं माणूस मनाला खूप वेड लावून जातं