Saturday, 4 May 2013

एक वादळ

एक वादळ माझ्याही आयुष्यात आलं होतं
काही क्षणांसाठी मनाला भुरळ घालून गेलं  होतं

का? कुणास ठाऊक मन त्यात गुरफटत गेलं होतं

एखाद्या पाचोळ्याप्रमाणे आकाशात उंचच उंच उडत गेलं  होतं

वादळाला कधी दिशा नसते हेच खंर असतं

पण वेड्या मनाला कितीही समजावून सांगितलं तरी समजत नसतं

शेवटी वादळाने त्याची दिशा बदललीच
मन मात्र जितक्या वेगाने आकाशात उडाले होते
तितक्याच वेगाने जमिनीवर आपटले आणि विखुरले