Saturday, 31 August 2013

कधी कधी

कधी कधी एखाद्या आठवणीने मन गहिवरून येतं 
अलगद डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं 

चित्रातलं माणूस अजूनही आपल्या मनावरती राज्य 
करतंय याची एक हलकीशी जाणीव मन करून देतं 

कधीतरी त्या चेहऱ्यासाठी झुरणारं मन अजूनही 
तेवढंच झुरतं याचा विचार मन मनाशीच करतं 

ज्या माणसाने आपल्याला कधीच आपलंसं केलं नाही 
त्याच्यासाठी हृदय अजूनही रडतं याचही आश्चर्य वाटतं 

No comments:

Post a Comment